कविता

आठवतोय या आठवणी ते क्षण,त्‍या भावना असे सर्व काही ती डायरी...

विझले ते सर्व ओल्‍या अश्रुनी उरली ती गळकी पाने

नावास एक डायरी पुस्‍तक आयुष्‍याचे पाने भरली सुख दुख:ची

आठवणीतल्‍या चेह-यांची काही पानं कोरीच राहून गेली

काळासकट काही गळून गेली पाने उलटता उलटता....

उमटतात ठसे कागदावर त्‍या जिथे होती ती गावं पुसली गेलेली

लिहीता लिहीता अश्रु ओथंबले लिहावेसे वाटले पण

ती पान गळून गेली आयुष्‍याचे पुस्‍तक एक साधी डायरी

गळक्‍या पानांचे पुस्‍तक कसले फक्‍त शिल्‍लक रद्दी...

असे एक गळके पान आयुष्‍यातले आठवणी सकट गळून गेलेला

ना पालटले पुन्‍हा मागच पान पुढे आयुष्‍य चालतच गेलं

0 comments:

Post a Comment